सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

अशा या स्त्री शक्तीस मानाचा मुजरा अन सलाम.

सौ . लता भगवान करे या ६६ वर्षीय  आजी आयुष्यभर काबाडकष्ट करण्यातच आयुष्य गेले अन आजही आपल्या आजारी पतीसाठी  अन संसारासाठी मिळेल ते काम  करत असतात अन आजारी पतीच्या इलाजासाठी कष्टकरी स्त्रीच्याच वेशात  नऊवारी साडी नेसून अन अनवाणी पायाने  बारामती मेरेथोनमध्ये भाग घेतात  अन  स्पर्धा तर  जिंकतातच  अन सर्वांचे मनही ………    अशा  या स्त्री शक्तीस मानाचा मुजरा अन सलाम. 

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

रुपया अन आपण

              जानेवारी २०११ मध्ये एका डॉलरसाठी ४३ रुपये मोजावे लागत होते, आज एका  डॉलरसाठी ६६ रुपये  ५५ पैसे  मोजावे लागत आहेत. डॉलरची किंमत  रुपयाच्या मानाने अधिक  असण्याचे कारण म्हणजे अमेरिका निर्यात जास्त प्रमाणात करते  आणि त्या तुलनेत आयात कमी करते. भारताची स्थिती नेमकी उलट आहे  भारत निर्यात कमी प्रमाणात करते  आणि त्या तुलनेत आयात जास्त करते.आपण जी आयात करतो त्याचे मुल्य  डॉलर मधेच द्यावे लागते. एक डॉलर मिळविण्यासाठी ६६.५५ रुपये लागतात . पण डॉलर कितीही महाग झाले तरी ते आपल्याला घ्यावेच लागतात . कारण तेलाची आयात करून त्या मोबदल्यात तेल उत्पादक देशांना पैसे रुपयात देऊन चालत नाही  तर त्यांना डॉलरमधेच द्यावे लागतात . 
                
                मे महिन्यापासून रुपयाच्या किमतीत  किमान २८ टक्क्यांची घसरण झाली आहे . रुपयाची जी प्रचंड घसरण सुरु आहे त्याचा फटका सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे . रुपयाची घसरण पाहता ऑटोतोमोबाईल सारख्या उद्योगांमधील रोजगारांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . खोलात चाललेल्या रुपयामुळे महागाई वाढत असून टि .व्हि., फ्रीज , वाशिंग मशीन तसेच वाहनेही महागणार आहेत. 
रुपयाच्या तुलनेत चढत्या दरांच्या स्पर्धेत उतरत सोन्याने नव  नवे उच्चांक गाठणे सुरु केले आहे. अन रुपयाच्या निचांकामुळे  आयात करण्यात येणाऱ्या सर्वच वस्तूंसाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे महागाई भस्मासुरासारखी  वाढत चालली आहे. 

                  गोदरेज अप्लायन्सेस आणि हायर या कंपन्यांनी सप्टेंबर पासून इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या किमतीत ४ ते ७ टक्क्यांनी वाढ करण्याचे ठरवले आहे.सॅमसंगने नुकतीच मोबाईल अन टबलेटच्या  किंमतीत वाढ केली असून लवकरच गृहोपयोगी वस्तूंच्या किमतीतही वाढ करण्याचा विचार कंपनीने बोलून दाखविला आहे. जनरल मोटरही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बिट ,सेल,आणि एन्जॉय या गाड्यांच्या किमती २ ते १० हजार रुपयांनी  वाढवणार आहे. जगातील विविध देशांमधील चलनांसमोर रुपयाने नांगी टाकल्यामुळे डॉलर सोबतच या देशांमधून आयात होणार्या वस्तुंच्याही  किमती वाढणार आहेत. अन आगामी काळात महागाईचा फटका सर्वांनाच बसणार आहे.  अन डॉलर ची किंमत वाढल्यामुळे डीझेल व पेट्रोल च्या किमतीत वाढ होणे अटळ  असल्यामुळे वाहतूक खर्च वाढेल अन परिणामी सर्व स्तरातून महागाई वाढेल .

            'डॉलर'ची किंमत वाढल्यामुळे डिझेल आणि पेट्रोल यांचे भाव वाढतात. कारण ते विकत घेण्यासाठी आयातदारांना एका'डॉलर'पाठीमागे अधिक पैसे मोजावे लागत असतात. रॉकेल,पेट्रोल, डिझेल आणि गॅस महागले की, जीवनातील प्रत्येक गोष्ट महाग होते. कच्चे तेल, खाद्य तेल, डाळी, औषधे, कोळसा, खते या सर्व गोष्टी महागतात. भारताची आयात मोठी आहे त्यामुळे  ज्या वस्तू भारत आयात करतो त्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागतात व  आयातखर्च वाढला की, त्याच्या विक्री मूल्यात वाढ होते. तसेच  उत्पादन खर्चातही वाढ होते. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आस्थापनांना कर्मचारी कपात किंवा वेतन कपात करावी लागते. परिणामी महागाईबेरोजगारी, गरिबी  या सगळ्यात कमालीची वाढ होते.  

              रुपयाची किंमत सुधारायची  असेल तर  आपल्याला आयात कमी आणि निर्यात अधिक करावी लागेल.  निर्यातीसाठी उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढवावी लागेल. त्यासाठी देशातील मुख्य अशा शेती व्यवसायाला आधुनिकतेची  जोड देऊन शेतमालात वाढ करणे गरजेचे  आहे.  नैसर्गिक साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे . पेट्रोल , डीझेलवरच अवलंबून राहण्यापेक्षा  नवीन उर्जास्त्रोत्रांचा शोध  घेणे आवश्यक आहे. तसेच ज्ञात असलेल्या नैसर्गिक  उर्जास्त्रोत्रांचा जसे सौर उर्जा सारख्या नैसर्गिक  उर्जास्त्रोत्रांचा जास्तीत जास्त वापर करून घेणे गरजेचे आहे. 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोलकर हे एकमेकांचे समान शब्द

      
       
        अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज २० ऑगस्ट, २०१३ मंगळवार रोजी  सकाळी साडेसात वाजता पुण्यातील महर्षी शिंदे पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली . पूलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या पाठीच्या बाजूला लागली आणि एक चुकीच्या दिशेने गेली हल्लेखोरांनी दाभोळकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात झाडण्यात गोळ्या लागल्यामुळे दाभोळकर घटनास्थळीच कोसळले गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले हल्लेखोर ३० ते ३५ वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱयाच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले 


        जादूटोणा विरोधातील कायदा व्हावा यासाठी डॉ. दाभोलकर प्रयत्नशील होते. ७ जुलै १९९५ला युती शासनाने या विधेयक मांडले होते. मात्र, गेल्या १८ वर्षांपासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत विधेयक रखडलेले आहे. बाबा आढाव यांच्या 'एक गाव- एक विहीर' या चळवळीत नरेंद्र दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती'मध्ये कार्य सुरू केले. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'स्थापन केली. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या एकाच विषयाला स्वत:ला आयुष्यभर बांधून घेतलं. पुढे १९८२मध्ये ते या चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले आणि त्यातूनच १९८९मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना डॉक्टरांच्याच पुढाकाराने झाली. या सार्‍या काळात डॉक्टरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना महाराष्ट्रातील गाव अन गाव पिंजून काढला. हजारो व्याख्यानं दिली. शेकडो शिबिरं घेतली. तितक्याच संख्येनं बुवाबाजी करणार्‍यांविरोधात वाद ओढवून घेतले आणि त्यांना समर्थपणे उत्तरंही दिली. असंख्य लेख आणि डझनभर पुस्तकं लिहिली.मराठी बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते अशी ​डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.


      संयम शिकवणारा धर्म आंधळ्या अतिरेक्यांच्या मुठीत कैद झाला तर  कथित धार्मिकतेला उदंड उधाण आलेले, तर दुसरीकडे सर्वच धर्मानी उद्घोषलेली नीतीतत्वे मात्र सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे खुरडत चाललेली आहेत . असे का घडत आहे, का घडवले जाते याचा विचार होण्यासाठी प्रबोधनासोबतच एका व्यापक समाज परिवर्तनाची गरज आहे. मानसिक गुलामगिरीची सर्वात भयानकता ही की त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही मग तो पडणे तर दूरच राहिले. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचारांची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात. व्यक्ती परतंत्र बनते. परिवर्तनाची लढाई मग अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनवून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळींसाठी तयार करावयास हवे’  हे मनापासून समजून घेणं हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल असेल, तेव्हा प्रत्येकानं आपण स्वत:वरचा विश्वास गमावला आहे का, ते प्रामाणिकपणे तपासून पाहण्याची गरज आहे.अघोरी अंधश्रद्धांबाबत कायदा करण्याची गरज आहे, असे  डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे स्पष्ट मत होते. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोलकर हे एकमेकांचे समान शब्द बनून गेले होते. 

      महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आज फक्त नरेंद्र दाभोळकरांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचीच हत्या झाली, समाजातल्या त्रुटी, वाईट-चुकीच्या गोष्टी-परंपरा या विरुद्ध आयुष्यभर लढणारे डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारखे अनेक थोर विचारवंत या महाराष्ट्राच्या भूमीला लाभले म्हणून तर आपण अभिमानाने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा टेंभा सर्वत्र मिरवीत असतो. वैचारिक लढाई बंदुकीच्या गोळ्यावर जिंकता येते हा चुकीचा संदेश जर जायला नको असेल तर डॉ . नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी शोधून त्यांचा हत्येचा उद्देश समोर येणे अन त्यांना त्यांच्या दुष्कृत्याबाबत सजा होणे गरजेचे आहे. 


साहित्य संपदा 

अंधश्रद्धा विनाशाय -राजहंस प्रकाशन 
ऐसे कैसे झाले भोंदू -मनोविकास प्रकाशन 
झपाटले ते जाणतेपण -संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ. 
ठरलं... डोळस व्हायचंय -मनोविकास प्रकाशन 
तिमिरातुनी तेजाकडे -राजहंस प्रकाशन 
प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)-राजहंस प्रकाशन 
भ्रम आणि निरास -राजहंस प्रकाशन 
विचार तर कराल? -राजहंस प्रकाशन 
विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी -दिलीपराज प्रकाशन 
श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. २००२) 
सौजन्य : विकीपीडिया

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

केसांचे वाढीसाठी घरगुती उपाय

             कोरफडीच्या एका मोठ्या पानाला एका बाजूने चाकूने कापून त्यात मावतील  इतके मेथीचे दाने भरावेत . कोरफडीच्या गरातील पाण्यावरच मेथीच्या दाण्यांना चार दिवसांनतर छानपैकी मोड (कोंब ) येतील. नंतर कोरफडीचे लहान लहान तुकडे करून अर्धा लिटर खोबरेल   तेलात  मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांसह उकळून घ्यावेत. कोरफडीतील  पाण्याचा अंश संपेपर्यंत मंद आंचेवर तेल उकळावे अन थंड झाल्यावर बाटलीत भरून   ठेवावे . रात्री झोपताना दिवसाआड केसांना लावावे . 
             मेथी व कोरफड युक्त तेलाने केस गळायचे थांबून हमकास वाढतातच. 




शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

‘जागतिक आदिवासी दिवस’

आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर  डोंगर दर्‍यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्‍याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्‍या रानमेवाव्यावर करीत आहे. आजही गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, किनवट, आदिलाबाद (आंप्र.) या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले.  भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. आदिवासी हे हिंदू नाहीत, असा निर्णय न्यायालयाने एका प्रकरणात १९ जानेवारी १९७९ रोजी दिला आहे. आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते होऊन गेले  क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे , बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा, या प्रत्येकाची शासनाने, पाठय़पुस्तक मंडळाने दखल घेतली पहिजे. 
रावणाचे वंशज आजही आदिवासी म्हणूनच श्रीलंकेत ओळखले जातात अन त्यांना श्रीलंका शासनाकडून तशी वंशज म्हणून रक्कम अदा केली जाते .  

मंगळवार, १६ एप्रिल, २०१३


 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे युगपुरुष,या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. 'भारतीय घटनेचे शिल्पकार', माणसा-माणसांतील संबंध. हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा मूळ उद्देश होता,कोकणातील अन्यायकारक खोत पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडणारे गरीब शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी. १९४२ ते १९४६ या चार वर्षांत व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना या देशातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निभीर्ड मजूरमंत्री,भारतातील स्त्रियांच्या समान अधिकारांची सनद असलेल्या हिंदू कोड बिलाचे निर्माते आणि सरकारमध्ये ते मान्य होत नाही, असे दिसताच स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाचे राजीनामा देणारे 'स्वाभिमानी' केंदीय मंत्री,डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते.कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील १०० विद्वानाच्या यादीत प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. 
      अशा या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन अन कोटी कोटी प्रणाम.

बुधवार, १० एप्रिल, २०१३

गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षदिन!


गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षदिन!
        
                        
      हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात गुढीपाडवा.गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा ! युगादी तिथीचैत्र शुद्ध प्रतिपदा चैत्र शुक्ल एकादशीशी अनेक महत्त्वाचे दिवस निगडीत आहेत.ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलीम्हणजे सत्ययुगाला सुरुवात झालीतो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. दुर्गेच्या उपसानेचा दिवसही हाच. श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक,सम्राट विक्रमादित्याद्वारे विक्रम संवतचा प्रारंभयुधिष्ठिराचा राज्याभिषेकयुगाब्ध संवत प्रारंभ,शीखांमधील द्वितीय गुरू अंगद देवजी यांचा जन्मवरूण अवतार असलेल्या झुलेलाल यांची जयंतीआर्य समाजाचा स्थापना दिवसशालिवाहन शकाचा आरंभ.
गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्वही आहे .वसंत ऋतूचा  प्रारंभयाच दिवशी होतो. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असताततर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
     गुढी पाडव्याचे ऐतिहासिक महत्त्वम्हणजे रामाने वालीचा वध या दिवशी केला. दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले तो हा दिवस. रावणवधानंतर अयोध्येला परतणार्‍या रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली जाते. विजयाचे प्रतीक हे उंच असतेम्हणून गुढी उंच उभी केली जाते. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्यासैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्यानेयाच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणनाशालिवाहन शक चालू केले.त्या अर्थाने गुढीपाडवा हा बहुजनांचा विजयोत्सव आणि वर्षारंभदिवसही म्हणू शकतो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एकगुढीपाडवाअक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धाअसे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे कीइतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतोया दिवशी नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.गुढीपाडव्याला वेळूची काठी स्वच्छ धुवूनतिला तांबडे वस्त्र नेसवूनफुलांची माळ व साखरेची गाठी,कडूनिंब बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. खाली रांगोळी काढली जाते. अष्टगंध अक्षता लाऊन पूजा करून मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच उभारून आनंद साजरा करतात.या दिवशी घरात गोडधोड बनवले जाते.या शुभदिनी नव्या वर्षात चांगले कार्य करण्याचा संकल्पकेला जातो व शुभेच्छा दिल्या जातात.
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.