गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षदिन!
हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात गुढीपाडवा.गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा ! युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा चैत्र शुक्ल एकादशीशी अनेक महत्त्वाचे दिवस निगडीत आहेत.ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. दुर्गेच्या उपसानेचा दिवसही हाच. श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक,सम्राट विक्रमादित्याद्वारे विक्रम संवतचा प्रारंभ, युधिष्ठिराचा राज्याभिषेक, युगाब्ध संवत प्रारंभ,शीखांमधील द्वितीय गुरू अंगद देवजी यांचा जन्म, वरूण अवतार असलेल्या झुलेलाल यांची जयंती, आर्य समाजाचा स्थापना दिवस, शालिवाहन शकाचा आरंभ.
गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्त्वही आहे .वसंत ऋतूचा प्रारंभयाच दिवशी होतो. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
गुढी पाडव्याचे ऐतिहासिक महत्त्वम्हणजे रामाने वालीचा वध या दिवशी केला. दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा आणि रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले तो हा दिवस. रावणवधानंतर अयोध्येला परतणार्या रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली जाते. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्यासैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्यानेयाच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणनाशालिवाहन शक चालू केले.त्या अर्थाने गुढीपाडवा हा बहुजनांचा विजयोत्सव आणि वर्षारंभदिवसही म्हणू शकतो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक- गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.गुढीपाडव्याला वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी,कडूनिंब बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. खाली रांगोळी काढली जाते. अष्टगंध अक्षता लाऊन पूजा करून मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच उभारून आनंद साजरा करतात.या दिवशी घरात गोडधोड बनवले जाते.या शुभदिनी नव्या वर्षात चांगले कार्य करण्याचा संकल्पकेला जातो व शुभेच्छा दिल्या जातात.
गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो.
Top 50 Casinos Near Bryson City, NC - Mapyro
उत्तर द्याहटवाFind the best casinos near Bryson City, NC in Bryson City, United 태백 출장마사지 States of America on Mapyro. Best Casino with Free Parking! · 시흥 출장안마 Bryson City Casino · Bryson City Casino 광명 출장안마 · Bryson City 강릉 출장마사지 Casino 안산 출장안마