आज गूड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील महत्वाचा दिवस ईस्टरच्या आधीच्या शुक्रवारी हा सण पाळला जातो. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्र्सिताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्र्सिती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्र्सिती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
येशू ख्रिस्त ज्या ज्यू धर्मात जन्माला आला त्या वेळचा तो समाज कर्मठ धर्मकल्पना आणि कर्मकांडाच्या प्रचंड प्रभावाखाली होता.त्यावेळच्या त्या व्यवस्थेचा मूळ उद्देश चांगला असला तरी त्यातून अनेकांचे हितसंबंध निर्माण झाले होते. एक मोठे मंदिर, तेथे नित्य होणारे प्रायश्चित, अर्पण, होमहवन, पशुबळी इत्यादीतून मोठे हितसंबध प्रस्थापित झालेले होते. धर्माच्या आधाराने त्या समाजातले धर्ममार्तंड समाजावर हुकमत गाजवीत होते.गरीब जनतेची पिळवणूक करीत होते.
परंतु येशू हे आपले आचरण शुद्ध ठेवा, इतरांवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा, त्याच्यावर स्वत:इतकेच प्रेम करा. आणि क्षमाकरा असे सांगत होते., ‘ईश्वर हा कुणी न्यायाधीश नाही, तो तुम्हाला शासन करायला उत्सुकही नाही उलट तो तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारा तुमचा वत्सल पिता आहे. तुम्हीही त्याच्यासारखी सर्वांवर प्रीती करा.’हे सांगत होते. अन लोकांना ही त्यांचे तत्वज्ञान आवडत होते. भावत होते.
पण एकदा समाजाचा विवेक सुटला की तो खुनी आणि दंगेखोर माणसालाही माफ करायला तयार होतो; मात्र कर्मठ धर्मविचाराच्या प्रभावाखाली आला तर येशू ख्रिस्तासारख्या प्रेषितालाही फाशी देतो हे सिद्ध करतो. पण ज्याची शिकवण योग्य असते ती शिकवण अमर असते त्यामुळे येशूच्या तत्त्वज्ञानाने मानवी जीवनावर गेली दोन हजार वर्षे आपला प्रभाव कायम ठेवला आहे. अन हाचत्याच्या तत्त्वज्ञानाचा, बलिदानाचा खरा विजय आहे. 