जगभरातल्याअत्याचारांच्या घटनांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की, सगळ्यात जास्त अत्याचार स्त्रियांवर झाले आहेत. हुंडाबळीचे प्रकरण असो अथवा कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून होणारे लैंगिक छळ किंवा खून, विनयभंग, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ अथवा बालविवाह अशा प्रकारचे अनेक अत्याचार स्त्रीवरच झाले आहेत. यात भरीस भर म्हणून सायबर अत्याचारांचे नवे भूत स्त्रियांच्या पाठीशी लागले आहे. सायबर अत्याचारांतही स्त्रीच ‘टारगेट’ बनली आहे. या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात स्त्रिया बळी पडत आहेत.मारल्या गेलेली महिला एकदाच मरते परंतु बलात्कार पीडित महिलेला क्षणाक्षणाला मरावे लागते. त्यामुळे अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षाच द्याअशी मागणी जोर धरू लागली आहे. नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराचे संतप्तपडसाद सर्व देशभर उमटले.राजधानी दिल्लीची कायदा आणि सुव्यस्थास्थिती थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असूनही बलात्काराच्या घटना वारंवार घडतआहेत.बलात्काराची घटना एखाद्या खेड्यात किंवा जंगलात घडलेली नाही. दक्षिण दिल्लीत तब्बल 90 मिनिटे हा किळसवाणा प्रकार सुरू होता. भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी (सावरी) येथील बोरकर कुटुंबातील तीन अल्पवयीन बहिणींवर पाशवी अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकार्यांनी दिला आहे. त्यानुसार लाखनी पोलिसांनी अज्ञात मारेकर्यांविरुद्ध भादंवि ३७६, ३७७, ३0२, २0१ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांच्या २0 चमू तपास करीत असल्या तरी अद्याप आरोपी गवसलेले नाहीत.ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे.दिल्ली गँगरेपमुळे महिलांच्या सुरक्षेबाबतचे औदासिन्य उजेडात आले असतानाच लाखनी तालुक्यातील या घटनेने जनमाणसाचा थरकाप उडविला आहे. या दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करायला शब्दच अपुरे पडतात असे सांगत बलात्कार्यांना फाशीची शिक्षाच द्या अशी जोरदार मागणी केलीसर्व स्तरातून केले जात आहे.पाशवी बलात्काराचे तीव्र पडसाद सोशल नेटवर्किंग आणि मायक्रो ब्लॉगिंग साइटवरही उमटले. त्या समाजकंटकांना जाहीर फाशी द्या,अशी मागणी नेटीझन्सनी लावून धरली आहे. काही नेटीझन्सनी तर इंडिया अगेन्स्ट रेप अशी कम्युनिटीही तयार केली. स्त्रियांवरील अत्याचार ही विकृती आहे. ती कायद्याऐवजी समाज मानसिकतेने नष्ट करणे गरजेचे आहे, स्त्री अत्याचाराचा खटला जेव्हा चालविला जातो, तेव्हा कायद्याच्या तरतुदींचा चुकीचा अर्थ लावला (इंटरपिटीशन) जातो. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभर रान उठले. माणसांचा विचार करून केलेले स्त्री अत्याचार- बलात्कार विषयक कायदे हे लांडग्यांना रोखू शकत नाहीत, हे भीषण सत्य मेणबत्त्यांच्या प्रकाशात चौकाचौकांत उजळून निघाले. फौजदारी प्रक्रिया संहिता- १९७३, भारतीय दंड संहिता व भारतीय साक्षीपुरावा अधिनियम- १८७२ या कायद्यामधील अनेक त्रुटींवर त्या निमित्ताने प्रकाशझोत पडत आहे. भारतीय दंड संहिता १८६० मध्ये लैंगिक अपराधाविषयी ३७५, ३७६, ३७६-अ, ३७६-ब, ३७६-क व ३७६-ड ही कलमे आहेत. कलम ३७५ मधील बलात्काराच्या व्याख्येनुसार स्त्रीशी तिच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीवाचून केलेला लैंगिक संभोग हा बलात्कार असतो. तिला कलम ३७६ मध्ये शिक्षेची तरतूद आहे. सात वर्षे ते दहा वर्षे ते आजीव व द्रव्यदंड अशी ती शिक्षा आहे. परंतु न्यायालय न्यायनिर्णयात पुरेशी व विशेष कारणे नमूद करून, सात वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या कारावासाची शिक्षा ठोठावू शकेल. बलात्काराच्या व्याख्येची व्याप्ती व शिक्षाही वाढवावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. फाशीची तरतूद चीन, इजिप्त, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी देशांत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडासारख्या राज्यांमध्ये रासायनिक आणि शारीरिक खच्चीकरण शिक्षेचा पर्याय आहे. ‘बलात्कार करणार्या पुरुषांना नपुंसक करण्याची कडक शिक्षा दिल्याशिवाय महिलांना सुरक्षित वाटणार नाही’ असे मतही काही ठिकाणी मांडले जात आहेत. परंतु शारीरिक व्यंगातून आणखी विकृतपणा केला जाणार नाही कशावरून?लैंगिक छळाच्या व्याख्येच्या व्याप्तीत ‘इव्ह टीजिंग’ व ‘ऍसिड हल्ले’ या गुन्ह्यांचाही समावेश करावा या मागणीचा प्रस्ताव सरकारने मान्य केला अशी बातमी काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केली. पण त्याविषयी सरकारची अधिकृत घोषणा नाही. प्रसिद्धी माध्यमांतील वक्तव्यांना प्रत्यक्ष कायद्याचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे एक नवीन संकल्पित कायद्याचा मसुदा सरकारला सादर करण्यात आला. त्याचे नाव आहे- ‘स्त्रियांवरील अत्याचार प्रतिबंधक अधिनियम- २०१२.’ कलम ३५४ मध्ये नमूद आहे की, जर कोणी कोणत्याही स्त्रीवर हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केला आणि तिचा विनयभंग करण्याचा त्यामागे उद्देश असेल तर त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होईल. कलम ५०९ नुसार, स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने केलेला शब्दोच्चार, हावभाव किंवा कृतीस एक वर्षपर्यंत कारावासाची शिक्षा आहे. हे दोन्ही गुन्हे जामीनपात्र असल्यामुळे महिलांची छेडछाड करणार्यांना ३५४ व ५०९ या कलमांचा धाक वाटत नाही. हे गुन्हे अजामीनपात्र करावे अशी शिफारस न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीने २०११ मध्ये राज्य सरकारकडे केली होती. महिलांवरील वाढत्या अत्याचारांस पायबंद घालण्यासाठी अत्याचारसंबंधित तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची वाट न पाहता हे काम करावे अशी अपेक्षा धर्माधिकारी अहवालात व्यक्त झाली. आंध्र व मध्य प्रदेशात अशा प्रकारचे दुरुस्ती कायदे आहेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राखाली असलेल्या गोवा राज्यात असा दुरुस्ती कायदा नाही. परिणामी महिलांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. गोव्यात जानेवारी २०१२ ते ऑक्टोबर २०१२ या दहा महिन्यांत ४२ बलात्कार व ६६ आत्महत्या ही आकडेवारी त्याची साक्ष आहे. दिल्ली उच्च न्यायालयास मात्र उशिरा का होईना जाग आली व दिल्लीतील लैंगिक छळाच्या सर्व खटल्यांची दैनंदिन सुनावणी करण्याचा आदेश सर्व अतिरिक्त न्यायाधीशांना दिला. तेथील मुख्य न्यायाधीश डी. मुरुगसन यांचा हा निर्णय दिल्लीपुरताच सीमित असला तरी त्यापासून सार्या देशाला व गोव्याला शिकता येईल. ज्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला, त्याचे नाव, छायाचित्र पोलीस वेबसाइटवर प्रकाशित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा बलात्कारविरोधी आंदोलनाचा भला मोठा विजय आहे. पण फक्त बलात्कार्यांचाच का? ज्याच्या विरोधात विनयभंग किंवा इतर लैंगिक अत्याचारांचा गुन्हा शाबीत झाला त्यांनाही जाहीर लाज करायला हवी. महिलांवरील अत्याचार हा केवळ त्यांनी परिधान केलेल्या कपड्यावर होत नसून महिलांवरील अत्याचार हा सामाजिक मानसीकतेमुळे होत आहे. आज देशात तीन वर्षापासून ते ७० वर्षापर्यंतच्या महिलेवर अत्याचार होत आहे. यामुळे तीन वर्षाची मुलगी कोणते कपडे परिधान करते, तीने कपडे परिधान केल्यामुळे हा अत्याचार होतो का? याच बरोबर समाजातील अंध,अपंग,गतिमंद महिलेवर सुद्धा अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत. यामुळे महिलेने केलेल्या कपडे परिधानामुळे किंवा श्रृंगारामुळे केल्याने हे अत्याचार होत नसून यासाठी समाज मानसिकता बदलने आज गरजेचे आहे. यासाठी समाजातूनच जनजागृती निर्माण झाली पाहिजे. कितीही कायदे तयार केले तर अशा घटना रोखता येणार नाहीत. यासाठी समाजानेच असे प्रकार रोखले पाहिजेत. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यासाठी समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे. महिलांना स्वत:चा बचाव करण्यासाठी कराटेसारखे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटी झाली आहे, या एकूण लोकसंख्येत पुरुषांची संख्या ६२ कोटी ३७ लाख, तर महिलांची संख्या ५८ कोटी ६५ लाख एवढी असल्याचे १५ व्या जनगणनेच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.अलीकडच्याकाळात स्त्रियांवरील वाढत चाललेले सायबर अत्याचार केवळ छेडछाड किंवा ब्लॅकमेल करण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. स्त्रियांची खासगी माहिती चोरून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. दिल्लीसारख्या शहरांमधील उपलब्ध आकडेवारीवरून सायबर अत्याचार करणारे ५० ते ७० टक्के लोक कामाच्या ठिकाणचे असल्याचे आढळून आले आहे. नोकरी पेशातल्या महिलांबाबतच अधिक गुन्हे आहेत. अलीकडच्या काळात स्त्रियांवरील वाढत चाललेले सायबर अत्याचार केवळ छेडछाड किंवा ब्लॅकमेल करण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. स्त्रियांची खासगी माहिती चोरून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. युवती, महिलांची छायाचित्रे चोरून छायातंत्रज्ञानाच्या माध्यमातून ती अश्लील छायाचित्रांमध्ये बदलली जाऊ शकतात व तशी बदललेली छायाचित्रे आपल्या परिचयाच्या लोकांमध्ये प्रचारित,प्रसारित करून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा घटना देशभरातल्या अनेक छोट्यामोठ्या शहरांमध्ये घडल्या आहेत. आपल्या या बदनामीमुळे अनेक मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी इहलोकीची यात्राच संपवून टाकली. शिवाय पोलिसांत जावे तर आणखी बदनामीच पदरात पडते. त्यामुळे असले अत्याचार निमूटपणे सहन करणार्यांची संख्याही मोठी आहे. १९७५ला युनोचे ' स्त्री-दशक ' जाहीर झाले आणि मी स्त्री-पुरुष विषमता , स्त्रियांवर होणारे अत्याचार विचारात घेऊन स्त्रियांसाठी कायदेशीर आणि सामाजिक चळवळ सुरू करण्यात आली.. स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्यातर असे पाहण्यात येत आहे की, दुसरे अपत्य असलेल्या (?) मुलींची संख्या ( १००० मुलांचे ) मागे ७५९ आहे. तर प्रत्येक हजार पुरुषांमागे १९९१- ९४५ तर २००१ - ९२७ स्त्रियांची संख्या आहे. लहानपणी घरात सती सावित्री, पार्वती, सीता यांच्या गोष्टीघरात सांगितल्या जातात. पार्वती पतिव्रता होती, हे नेहमी मनावर बिंबवले जाते, पण तिचा कणखरपणा, तिची जिद्द याची वाखाणणी कोणीच करीत नाही.लेकीचा ग जलम । भाड्याचा बईलकधी इसावा हुईल । देवा ठावंलेकीचा ग जलम । देव देऊनी चुकलाबैल घाण्याला उपला । जलमभरी या ओळीतूनच भारतीय स्त्रीची, विशेषतः ग्रामीण स्त्रीची किती दुरवस्था झाली आहे हे स्पष्ट होते. स्त्रीवर होणाऱ्या या सर्व अत्याचाराचे तिच्या दुःस्थितीचे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी मुलींच्या शिक्षणाइतके परिणमकारक दुसरे साधन नाही. एका मुलीला शिकवणे म्हणजे अख्या कुटुंबाला शिकविण्यासारखे आहे. स्त्रियांपुढे गंभीर समस्या आहेत, पण शिक्षण या जादूच्या कांडीने सोडविली. भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीच्या थोडक्यात प्रवास १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यवसायीक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिपिंक स्पर्धामध्ये पुरूष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी,सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटिल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब,भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिक रित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई,ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनिता विल्यमस, अंजु जॉर्ज, कल्पना चावला, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कतृत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल, याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणेम बसे कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत.सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत. आताच राष्ट्रकूल स्पर्धामध्ये भारतीय महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या राष्ट्रीय राजकारणांत महिलांची संख्या नगण्या आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहे. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढतेय. ही चांगली गोष्ट आहे. विविध क्षेत्रात मुली ठामपणे पाय रोवून उभ्या असल्याचे चित्र आज आहे.स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नीअथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे आधुनिक जगातील या व असंख्य हिरकणींनी आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षमय लढा देवून चढला आहे. त्यांच्या या संघर्षामुळेच कित्येक आयुष्य उभी राहिली आहेत. त्यांच्या या संघर्षातूनच त्यांच्या उदयाच्या आयुष्याची पहाट उगवणार आहे.शेवटी जाता जातात एक दृष्टीक्षेप स्त्री कार्यावर. उच्चा शिक्षीत पदावर काम करणाऱ्या महिलांची सर्वाधिक संख्या भारतात.· भारतातील सर्वोच्च पदावर महिला विराजमान· जगात सर्वाधिक भारतात नोकरी करणाऱ्या महिला· जगात सर्वाधिक महिला अभियंते भारतात· भारतात २५० उद्योगांमध्ये महिला कार्यकारी प्रमुख· भारतीय सैन्यात महिलांना परमनंट कमिशन देण्याची न्यायालयाची शिफारस.अशाच प्रकारे आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.स्त्री पूर्वीपासूनच घर सांभाळतेच.पूर्वी घर सांभाळणे म्हणजे कष्ट,कष्ट,आणि कष्टच घर सांभाळणे म्हणजे चुलीवर स्वयंपाक,जात्यावर दळण,कांडण ,टिपण,नदीवरून पाणी आणने,कापडे धुणे,शेणगोठा, वर वर्षाला एक बाळंतपण,मोठे कुटुंब अन इतके करून कुटुंबाच्या पारंपारिक व्यवसायात मदत करणे आज स्वरूप बदललेय पण कष्ट कमी झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करत जगणे म्हणजे तारेवरची कसरतच.
शिखा शर्मा, चंदा कोचर आणि इंदिरा नुई यांचा जागतिक शंभर महिलांमध्ये समावेश झाला आहे.शेवटी मी एवढेच सांगेल की मुलींनो...... हे शतक आपले आहे. संधी गमावू नका. पुढे या आणि तुमची सकारत्मकता, मौलिकता जगाला दाखवा. स्वतःला सिद्ध करून जगाला पटवून द्या. ………. GIRLS ARE ROCK….
मंगळवार, ५ मार्च, २०१३
आजचा समाज अन स्त्री (जागतिक महिला दिनानिमित्त )
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा